70 वर्षांपासून शहरात झाला नाही एकही मृत्यू
एका अशा ठिकाणाबद्दल जाणून घेतल्यावर अवाप् व्हायला होते. या अनोख्या ठिकाणी 70 वर्षांमध्ये एकही माणूस मृत्युमुखी पडलेला नाही. हे वाचून विचित्र वाटत असले तरी हेच पूर्ण सत्य आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी लोकांचे वास्तव्य असले तरीही 70 वर्षांपासून कुणाचाच येथे मृत्यू झालेला नाही
हे अनोखे ठिकाण नॉर्वेमध्ये आहे. येथे अनेक सुंदर जागा असल्याने जगातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांमध्ये याचा समावेश होतो. नॉर्वेमधील या ठिकाणाचे नाव लाँग इयरबेन आहे. या ठिकाणी कुणीच मरू शकत नाही.

नॉर्वेला मिडनाइट सन या नावाने देखील ओळखले जाते. या देशात मे महिन्यापासून जुलै महिन्यापर्यंत सूर्यास्त होत नाही. येथे सलग 76 दिवसांपर्यंत दिवस असतो आणि रात्र होतच नाही. येथील स्वालबार्डमध्येही सूर्य 10 एप्रिल ते 23 ऑगस्टपर्यंत मावळत नाही. लाँग इयरबेनच्या प्रशासनाने लागू केलेल्या एका कायद्यामुळे तेथे लोक मरू शकत नाहीत. तेथे माणसांच्या मृत्यूवरच बंदी घालण्यात आली आहे.
काय आहे कायदा?
नॉर्वेच्या उत्तर धूवात स्थित लाँग इयरबेनमध्ये वर्षभर कडाक्याची थंडी असल्याने येथे मृतदेह सडत नाहीत. याचमुळे येथे प्रशासनाने माणसांच्या मृत्यूवर बंदी घातली आहे. सर्वात हैराण करणारी गोष्ट म्हणजे या शहरात 70 वर्षांमध्ये कुणाचाच मृत्यू झालेला नाही.
100 वर्षांपूर्वी झाला होता मृत्यू
या अनोख्या शहरात ख्रिश्चन धर्मीयांचे प्रमाण अधिक आहे. 1917 मध्ये येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, तो इन्फ्लुएंजाने पीडित होतो. त्या व्यक्तीच्या मृतदेहाला लाँग इयरबेनमध्ये दफन करण्यात आला होता, पण त्याच्या मृतदेहात अद्याप इन्फ्लुएंजाचे विषाणू आहेत. याचमुळे प्रशासनाने येथे कुणाच्या मरणावर बंदी घातली आहे, जेणेकरून शहराला महामारीपासून वाचविता येईल. या शहराची लोकसंख्या सुमारे 2 हजार इतकी आहे. येथे कुणी आजारी पडल्यास त्याला विमानाने अन्य ठिकाणी पोहोचविले जाते. त्याच ठिकाणी मृत्यू झाल्यावर त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात येतात.









