‘स्त्रियश्चरित्रम् पुरुषस्य भाग्यम् देवो न जानाति, कुतो मनुष्यः’ असे संकृत वचन आहे. यापैकी स्त्रियश्चरित्रम’ हा भाग सोडून देऊ. कारण त्यातून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पण ‘पुरुषस्य भाग्यम्’ केव्हा फळफळेल ते देवही जाणू शकत नाही, यावर सर्वांचे एकमत होण्यास हरकत नाही. पण केवळ पुरषांचेच नव्हे, तर अनेकदा स्त्रियांचेही भाग्य फळफळते. अशीच घटना अमेरिकेत घडली.
या देशातील एक महिला चँडलर वेस्ट यांनी एका ऑनलाईन लिलावात भाग घेतला. त्यांना एक हँडबॅग पसंत पडली आणि त्यांनी ती लिलावात विकत घेतली. ती त्यांना अवघ्या 1 डॉलरला मिळाली. बॅग घरी आल्यानंतर त्यांनी उत्सुकतेने ती उघडून पाहिली. ती बॅग त्यांना अगदी जुनी वाटली. पण नंतर त्यांनी बॅगकडे फारसे लक्ष दिले नाही. पुढे त्यांना असे वाटले की या बॅगची खरी किंमत जाणून घ्यावी. म्हणून त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून चौकशी केली. त्यांना अनेक संदेश प्राप्त झाले. त्यातून ही बॅग ‘अँटिक’ असल्याचे स्पष्ट झाले.
अशा वस्तूंना बाजारात प्रचंड किंमत मिळू शकते. ही बॅग 1920 ची असून ती ओरिजिनल प्रेंच लग्झरी ब्रँड कार्टियरची आहे, हेही उघड झाले. ऐतिहासिक वस्तूंची खरेदी-विक्री करणाऱया व्यापाऱयाकडे त्पा गेल्या. व्यापाऱयाने पाहणी करुन जे सांगितले ते ऐकल्यावर त्या अक्षरशः अवाप् झाल्या. कारण या बॅगला 12 अस्सल हिरे जडवलेले होते, ज्यांची आजची किंमत 4,000 डॉलर आहे. बाईंना 1 डॉलरच्या मोबदल्यात चक्क चार हजार डॉलर्स प्राप्त झाले आहेत.









