प्रतिनिधी/ म्हापसा
म्हापसा येथील हनुमान नाटय़गृहात प्रिती भोजनालय कक्षात भव्य पुस्तक प्रदर्शन व विक्रीचे दुकान थाटण्यात आले असून ग्राहकांसाठी या पुस्तक विक्रीवर विविध योजना आखण्यात आल्या आहेत. या पुस्तक प्रदर्शनात व पुस्तक विक्रीला ग्राहकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.
या पुस्तक प्रदर्शनाचे वैशिष्टय़ म्हणजे शंभर ते दोनशे प्रतिकिलो मराठी इंग्रजी पुस्तके नागरिकांना मिळत असून यावर 15 ते 50 टक्के ऑफरही ठेवण्यात आली आहे. कोविडच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशी या पुस्तकांची विक्री ठेवण्यात आली आहे. अशी माहिती आयोजकांनी दिली असून या संधीचा नागरिकांनी फायदा करून घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.









