इतर कंपन्यांचे फोल्डेबल फोन्स पुढील वर्षीच बाजारात ः शाओमी, ओप्पो याही स्पर्धेत
वृत्तसंस्था/ बेंगळूर
मोटोरोला कंपनीने 2019 मध्ये मोटो रेझर या स्मार्टफोनचे लाँचिंग केले होते. त्यानंतर या संदर्भातली सुधारित आवृत्ती 2020 मध्ये लॉन्च केली होती. 2021 मध्ये मोटो रेझर हा फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबतच्या अफवाच पसरवल्या जात असल्याचे दिसून आले आहे.
रोस यंग या तंत्रज्ञान क्षेत्रातील संस्थेने याबाबतची माहिती दिली आहे. याअगोदर आतापर्यंत त्यांनी दिलेली माहिती बरोबर ठरली आहे. संस्थेच्या माहितीनुसार मोटो रेझर हा फोल्डेबल फोन यंदा बाजारात येणार नाही आहे. पण इतरत्र मात्र सदरचा फोन यावर्षी बाजारात येणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात असल्याचेही रोस यंगने स्पष्ट केले आहे. मोटोरोला आणि सॅमसंग या सध्या दोन स्मार्टफोन कंपन्या फोल्डेबल फोन्सच्या स्पर्धेमध्ये एकमेकांना टक्कर देत आहेत. एलजी ही कंपनीही सदरचा फोन आणण्याच्या विचारात होती मात्र अलीकडेच या कंपनीने स्मार्टफोन उद्योगातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. शाओमी, गुगल पिक्सेल आणि ऍपलही आता फोल्डेबल स्मार्टफोनच्या व्यवसायामध्ये उतरणार असल्याचे सांगितले जात आहे. मोटोरो कंपनीला आपला फोल्डेबल फोन 2021 मध्ये आणायचा होता. पण आता हा फोन 2022 मध्ये बाजारात दाखल होणार आहे. 2022 च्या तिसऱया तिमाहीत फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च केला जाण्याची शक्मयता सांगितली जात आहे. शाओमी, ओप्पो, हॉनर यासारख्या दिग्गज कंपन्यांचे या वर्षाअखेर फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात येणार असल्याचे म्हटले असले तरी त्यात तथ्य नसल्याचे रोस यंग संस्थेने म्हटले आहे. सदर कंपन्यांचे फोल्डेबल स्मार्टफोन्स 2022 मध्ये लॉन्च केले जाण्याची शक्मयता रोस यंग यांनी व्यक्त केली आहे. मोटो रेझर 5 जी 2020 आवृत्तीचा स्मार्टफोन भारतामध्ये एकूण 90 हजार रुपयांना 8 जीबी रॅम व 256 जीबी साठवणूक क्षमतेसह मिळणार आहे. याआधी या स्मार्टफोनची किंमत ऑनलाइनवर एक लाख रुपयापर्यंत होती. फ्लिपकार्टने नंतर सवलतीत हा फोन 90 हजार रुपयांना उपलब्ध केला. 2019 आवृत्तीचा फोन सध्याला 55 हजार रुपयांना भारतामध्ये उपलब्ध आहे.









