सरकारने देशभरातील महत्त्वाच्या शहरात मेगा टेक्स्टाइल पार्कची स्थापना करण्याचे नियोजन केले आहे. संपूर्णपणे कार्यरत, जागतिक पातळीवरील स्पर्धेसाठी ची अद्ययावत निर्मिती व निर्यातक्षम असे पार्क स्थापीत केले जाणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. उत्पादन प्रोत्साहन योजनेंतर्गत याला चालना दिली जाणार आहे. पुढील 3 वर्षाच्या कालावधीत 7 टेक्स्टाइल पार्क्सची निर्मिती केली जाणार आहे. गुंतवणुकीच्या माध्यमातून हे टेक्स्टाइल पार्क वाहतुकीच्या माध्यमातून होणारे नुकसान टाळतील व विविध आधुनिक सुविधाही देतील.
कापड उद्योगासाठीही मेगा इंटीग्रेटेड टेक्स्टाइल रिजन अँड अपॅरल पार्कची स्थापना करण्याचे निश्चित केले आहे. 1 हजार एकर जागेवर होणाऱया या पार्कमध्ये सर्व त्या अद्ययावत सुविधा, सामान्य सुविधा आणि संशोधन तसेच विकासाची प्रयोगशाळा स्थापण्यात येणार आहे.
आतापर्यंत 59 टेक्स्टाइल पार्क योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेले आहेत ज्यापैकी 22 पूर्ण झालेले आहेत.









