नवी दिल्ली
नवी दिल्लीतील कंपनी मॅप माय इंडिया आपला आयपीओ भारतीय भांडवली बाजारामध्ये सादर करणार आहे. सदरच्या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 1200 ते 1300 कोटी रुपये उभारणार आहे. सदरच्या कंपनीची सेवा उबर टेक्नॉलॉजीस, टाटा मोटर्स, होंडा, टोयोटा, बीएमडब्ल्यू, मर्सिडिज बेंज, मॅकडोनॉल्ड, ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांच्याकडून घेण्यात येत असते. मॅप माय इंडियाने आयपीओकरीता सेबीकडे कागदपत्रांसह रितसर अर्ज सादर केला आहे.









