क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
सय्यद मुश्ताक अली टी-20 सीनियर क्रिकेट स्पर्धेत भाग घेणारा गोव्याचा 20 सदस्यीय संघ गोवा क्रिकेट संघटनेने जाहीर केला. सीनियर क्रिकेट निवड समितीची बैठक काल जीसीएच्या मुख्यालयात झाली. यावेळी जीसीएचे सचिव विपुल फडके, प्रशिक्षण संचालक आणि क्रिकेट ऑपरेशन्सचे प्रकाश मयेकर, निवड समितीचे चेअरमन गिरीष पारेख तसेच सदस्य आनंद म्हापणकर व संजय धुरी उपस्थित होते. सय्यद मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा लखनौत 27 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे.
गोव्याचा सीनियर क्रिकेट संघ याप्रमाणेः एकनाथ केरकर (कप्तान), इशान गडेकर, वैभव गोवेकर, आदित्य कौशिक, सुयश प्रभुदेसाई, स्नेहल कवठणकर, शुभम रांजणे, मोहित रेडकर, दिपराज गावकर, विशंभर कॅहलोन, दर्शन मिसाळ, अमुल्य पांड्रेकर, अमित यादव, मलिकसाब शिरुर, समर दुभाषी, वीजेश प्रभुदेसाई, फॅलिक्स आलेमाव, निहाल सुर्लकर, श्रीकांत वाघ व लक्षय गर्ग.









