वार्ताहर / राजापूर
शहरात मास्क न लावता फिरणे काहींना चांगलेच महागात पडले आहे. मंगळवारी राजापूर पोलिसांनी मास्क न लावता फिरणाऱया तब्बल 22 जणांवर दंडात्मक कारवाई करत 11 हजार रूपये दंडाची वसुली केली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विनामास्क फिरणाऱयांवर धडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मंगळवारी राजापूर पोलिसांनी शहरात विनामास्क फिरणाऱयांना दणका दिला. जवाहर चौकात मास्क न लावता फिरणाऱया दुचाकी, चारकाची तसेच पादचाऱयांवर कारवाई करून पोलिसांनी प्रत्येक 500 रूपये दंड वसूल केला आहे. अवघ्या 2 तासांत 22 नागरिकांकडून प्रत्येकी 500 प्रमाणे 11 हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.









