तेथे जमिनीवर उतरतात तारे
जगातील सुंदर ठिकाणे पाहण्याची हौस असणाऱया लोकांसाठी मालदीव हा उत्तम पर्याय आहे. पहिल्यांदाच देशाबाहेर पडण्याचा विचार करत असाल तर मालदीवमध्ये सी ऑफ स्टार्सला स्वतःच्या ट्रव्हल लिस्टमध्ये अवश्य सामील करा. येथील सुंदर दृश्य पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. तेथे जणू पाण्यात तारे उतरत असल्याचा भास होतो.
मालदीवमधील हा छोटासा समुद्र किनारा ‘सी ऑफ स्टार्स’ स्वर्गापेक्षा कमी वाटत नाही. याचे सौंदर्य पाहून तेथून बाहेर पडण्याची इच्छाच होणार नाही. समुद्रकिनारी बसणे आणि शांत वातावरण आवडत असल्यास या बेटावर जाऊन सुंदर दृश्यांचा आनंद घेणे उत्तम पर्याय आहे. मालदीव हा शेजारी देश असल्याने तेथे जाणे भारतीयांसाठी तुलनेने सोयीचे आहे.

रात्रीच्या वेळी या समुद्रकिनारी निळय़ा रंगातील तारे दिसू येतात. याचमुळे याला सी ऑफ स्टार्स म्हटले जाते. प्रत्यक्षात यामागे रासायनिक कारण आहे. पाण्यात असलेल्या सागरी सुक्ष्मजीवांच्या निळय़ा ल्यूमिनिसन्स विषाक्त पदार्थांची निर्मिती करतात. रात्रीच्यावेळी हे पदार्थ चमकू लागतात आणि ताऱयांप्रमाणे दिसून येतात.
मालदीवच्या वाधू बेटावरील हे बीच रात्रीच्या वेळी अत्यंत मोहक भासते. जगभरातील पर्यटक येथे स्टार्सदरम्यान समुद्रस्नानाचा आनंद घेत असतात. समुद्र किनाऱयाचा आनंद घेण्यासाठी तेथे हॉटेलमध्ये वास्तव्यही करता येते.









