4 मे 2018 ते 27 ऑक्टोबर 2020 च्या दरम्यान निर्मिती करण्यात आलेल्या कारचा समावेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने आपल्या प्रवासी वाहनांच्या सेगमेंटमधील हजारो गाडय़ा परत मागविल्या आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार सदरच्या गाडय़ांच्या सेफ्टी फिचर्समध्ये काहीसा बिघाड झाल्याचे समोर आले आहे, अशा काही मॉडेल्स कंपनीने परत मागविल्या आहेत.
त्यामध्ये सियाज, अर्टिगा, विराट ब्रेझा, एस-क्रॉस आणि एक्सएल6 या मॉडेलचा समावेश असल्याची माहिती आहे. मारुतीने या पाच मॉडेलच्या एकूण 181,745 कार्स परत मागविल्या असून या कार्सची निर्मिती ही 4 मे 2018 ते 27 ऑक्टोबर 2020 च्या दरम्यान करण्यात आली होती.
दुरुस्तीचे काम नोव्हेंबर 2021 पासून
ग्राहकांच्या कार सेफ्टीमधील कोणतीही समस्या समोर आल्यास संबंधीत दुरुस्ती करण्याचे काम हे नोव्हेंबर 2021 च्या पहिल्या आठवडय़ापासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
वेबसाईटवर तपासा
ज्या ग्राहकांची अर्टिगा आणि विटारा ब्रेझा ली कंपनीची वेबसाईट www.marutisuzuki.com वर आणि सियाज, एक्सएल6सह एस क्रॉस ली यांच्यासाठी www.nexaexperience.com आदी वेबसाईटवर जाऊन ‘Imp Customer Info’ या सेक्शनमध्ये तपासून आपल्या वाहनांचा चेस नंबर तपासण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती कंपनीने यावेळी दिली आहे.









