वृत्तसंस्था/ मुंबई
ऍमेझॉनने देशाच्या कृषी क्षेत्रात प्रवेश केला असून शेतकऱयांसाठी नवीन ऍप लाँच केले आहे. शेतकऱयांसाठी कृषीशीसंबंधीत पिकांना अधिकची सुरक्षितता प्रदान करण्याचे काम हे ऍप करणार असल्याची माहिती ऍमेझॉनने दिली आहे.
ऍमेझॉनने या प्रोगॅमला रिऍक्टिव्ह आणि प्रोऍक्टिव्ह क्रॉप प्लॅन असे नाव दिले आहे. या प्रोगॅममध्ये उत्पादकांना अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अन्य माहिती उपलब्ध होणार आहे. यासोबतच ऍमेझॉन कॉर्पोरेट अशा दिग्गज क्लबमध्ये समाविष्ट होणार आहे.
ऍमेझॉनची कृषी क्षेत्रात पहिली झेप
देशाच्या कृषी क्षेत्रात ऍमेझॉनने प्रथमच पाय ठेवला आहे. या अगोदर पासून सदरच्या क्षेत्रावर टाटा, रिलायन्स आणि फ्लिपकार्ट नजर ठेवून आहेत. यामध्ये ऍमेझॉन शेतकऱयांना पिकांकरीता निर्णय घेण्यासाठी मदत करणार आहे.
‘ऍप’मधून मिळणार अलर्ट ऍमेझॉनने सांगितल्याप्रमाणे मोबाईल ऍपमधून किटक, हवामान, रोग, जमीन व अन्य पिकांशी संबंधीत प्रश्नांची उकल होणार असल्याची माहिती आहे. यामुळे हे ऍप शेतकऱयांना अधिक उपयुक्त ठरणार असल्याचा दावा ऍमेझॉनने केला आहे.









