रामनगर-कंग्राळी खुर्द येथील घटना
प्रतिनिधी/ बेळगाव
रामनगर, तिसरा क्रॉस परिसरात मोटारसायकलवरून आलेल्या दोघा भामटय़ांनी महिलेच्या गळय़ातील एक तोळय़ाचे मंगळसूत्र पळविले आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली असून एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
कस्तुरी हणमंत पम्मार ही महिला गिरणीला गेली होती. गिरणीहून घरी परतताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघा भामटय़ांनी कस्तुरी यांच्या गळय़ातील एक तोळय़ाचे मंगळसूत्र हिसकावून पलायन केले. या घटनेनंतर धास्तावलेल्या कस्तुरी यांनी आरडाओरड केली. लोक जमा होण्याआधी भामटय़ांनी तेथून पळ काढला होता. रात्री एपीएमसी पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी पुढील तपास करीत आहेत.









