ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात काल पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली दिसून आली आहे. मागील 24 तासात राज्यात 6 हजार 863 नवीन कोरोनाबाधित आढळले असून 5 हजार 212 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कालच्या दिवशी 123 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण 60 लाख 35 हजार 029 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.33 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.09 टक्के एवढा आहे.
- सध्या 94 हजार 985 ॲक्टिव्ह रुग्ण
दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,68,46,984 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,64,922 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,17,362 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,506 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सद्य स्थितीत 94 हजार 985 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.








