कळंबा : प्रतिनिधी
भाताची मळणी करताना मळणी मशिनमध्ये सापडून शेतमजूर महिला जागीच ठार झाली. शालन सुखदेव पाटील ( वय ५३) असे त्या महिलेचे नाव आहे. ही हृदयद्रावक घटना रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास करवीर तालुक्यातील कळंबा येथे घडली आहे. यांची नोंद रात्री उशिरा करवीर पोलिसात झाली आहे.









