कलाकृतीला भाषेचा उंबरठा नसतो हे म्हणणे खरं करणारे अनेक रिमेक आजवर पडद्यावर आले. रिमेकचे प्रयोग मोठय़ा पडद्यावर होतातच पण आता छोटय़ा पडद्यावरील मालिकाही विविध भाषांमध्ये रिमेक केल्या जात आहेत. मालिकांचे हे सीमोल्लंघन करण्याचा टेंड चांगलाच लोकप्रिय होत आहे. आता याच टेंडमध्ये मराठमोळी सासूबाई सीमा ओलांडून थेट तामिळमध्ये पोहोचणार आहे. अग्गबाई सासूबाई या मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱया पर्वाने मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर ही मालिका लवकरच तामिळ भाषेत रिमेक होणार आहे. त्यामुळे आसावरी, बबडय़ा, शुभ्रा, अभिज किचन, कोंबडीच्या, चप्पलचोर ही पात्र तामिळ भाषेतून नव्याने साकारली जाणार आहेत. या मालिकेत शुभ्राची भूमिका करणाऱया अभिनेत्री तेजश्री प्रधान हिनेच ही गुडन्यूज शेअर केली आहे.
सून पुढाकार घेऊन विधवा सासूबाईचे लग्न करून देते. त्यासाठी नवऱयाचा विरोध पत्करते अशी वन लाइन स्टोरी असलेल्या अग्गबाई सासूबाई या मालिकेच्या या हटके कथानकाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. या मालिकेने टीआरपीचे रेकॉर्ड तोडले. निवेदिता सराफ यांनी आसावरीची फक्त भूमिकाच नव्हे तर पाकातले घारगेही घराघरापर्यंत पोहोचवले. आशुतोष पत्की याने याच मालिकेतून अभिनयाची सुरूवात केली आणि त्याचा बबडय़ा हा मम्माज बॉय भाव खाऊन गेला. गिरीश ओक यांचा हॅपी गो लकी शेफही कमाल ठरला. तेजश्रीच्या शुभ्रानेही जणू अश्शीच सून हवी हा नवा टॅग आणला. थोडक्मयात काय तर अग्गबाई सासूबाईची भट्टी चांगलीच जमली. मालिका सुरू असतानाही खूप काही घडामोडी घडल्या. आजोबांची भूमिका करणाऱया रवी पटवर्धन यांचे निधन झाले आणि त्यांच्या जागी मोहन जोशी आले. मुख्य व्यक्तीरेखा साकारणाऱया निवेदिता यांना कोरोना झाला तेव्हा मालिकेत त्यांचे अनसीन किस्से सांगण्याचा वेगळा प्रयोग केला.
आता या मालिकेचा तामिळ भाषेत रिमेक होणार या बातमीने ही मालिका पुन्हा चर्चेत आली आहे. त्यामध्ये कोण कलाकार असतील हे गुलदस्त्याच आहे. तामिळ टीव्हीने या सध्या आई कुठे काय करते या मालिकेचा हिंदी रिमेक गाजत आहे. तर सन टीव्हीवर आभाळाची माया ही मालिका तामिळचा मराठी रिमेक आहे. राजा राणीची ग्ं जोडी ही मालिका तेलगू प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या पंक्तीत आता सीमा ओलांडून मराठी सासूसुनेची जोडीही बसणार आहे.
संकलन – अनुराधा कदम









