क्रीडा प्रतिनिधी /फोंडा
कुर्टी-फोंडा येथील अजिंक्य चेस अकादमीने आयोजित केलेल्या बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिराचा नुकताच समारोप झाला. शिबीरा दरम्यान घेण्यात आलेल्या स्पर्धेत मयंक गावडे व आरुष गावडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. एआर टय़ूशन क्लासिस व फोंडा तालुका बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने नवशिक्या व प्रगत खेळाडूंसाठी 10 दिवस हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.
प्रशिक्षक मिलींद गावडे यांनी शिबीरात मार्गदर्शन केले. नवशिक्या खेळाडूंसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत आरुष गावडेने प्रथम, कुनाक्षी गावडे द्वितीय, तुनाक्ष प्रियोळकर तृतीय व दिवेश प्रियोळकरने चौथे स्थान प्राप्त केले. प्रगत खेळाडूंच्या गटात मयंक गावडेने प्रथम, प्रतिक गावडे द्वितीय, समिक्षा कुर्टीकर तृतीय, भाविका सतरकर चौथे, मौमिता नासकर पाचवे, चेतन कुर्टीकर सहावे तर ध्रुवी कुर्टीकरने सातवे स्थान पटकावले. समारोप व पारितोषिक वितरण समारंभाला फोंडा तालुका बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष सागर साकोर्डेकर, सचिव अमोघ नमशीकर, खजिनदार अर्चना तेंडुलकर, श्रीकृष्ण देवालय समितीचे उपाध्यक्ष नागेश गावडे, एआर टय़ूशन क्लासिसचे प्रमुख आनंद कुर्टीकर, अजिंक्य चेस अकादमीचे प्रमुख रविंद्र कुर्टीकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ममता कुर्टीकर यांनी केले.









