वार्ताहर / हरमल
मधलामाज मांदे येथील श्री मारुतीराय बलभीम देवता मंदिराचा नुतूनिकरण,मूर्ती व शिखर प्रतिष्ठापना सोहळा रविवार 25 रोजी उत्साहात साजरा झाला.
काल सकाळी 9 वाजून 5 मिनिटांच्या शुभमुहूर्तावर मूर्ती व शिखर प्रतिष्ठापना विधी संपन्न झाला.तत्पूर्वी श्री मारुतीरायाची नुतून मूर्तीची प्रतिष्ठापना झाली.जेष्ठय श्री तुकाराम व सौ अंजली हरमलकर यांच्या यजमानपदाखली मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली.शिखर कलश सोहळय़ाचे यजमानपद सौ रूपा व श्री विजयकुमार नागवेकर तर तुळशी वृ?दावनचे उद्यापन यजमानपद सौ रेश्मा व रमेश पोखरे यांनी केले.पौरोहित्य बाळकृष्ण जोशी यांनी केले.तदनंतर आरती,तिर्थप्रसाद व मनोहर तुकाराम हरमलकर पुरस्कृत महाप्रसाद करण्यात आला. या सोहळय़ाला गांवातील प्रतिष्ठित व भाविकांनी उपस्थित राहून श्रींचे आशिर्वाद व प्रसादाचा लाभ घेतला.सदर श्री मारुती मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान असून दर शनिवारी,श्री हनुमान जयंती व अन्य उत्सवात मांदे,हरमल,पालये,केरी गांवातील भविकजन उपस्थिती लावीत असतात.काल संपूर्ण परिसर विद्युतरोषणाई केल्याने भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. सोहळय़ास गांवातील भाविकांनी कोविड नियमांचे पालन करून उपस्थिती लावली होती.









