प्रतिनिधी/ सातारा
जुना आरटीओ चौक ते वाढेफाटाकडे जाणाऱया रस्त्यालगत असणाऱया भिक्षेकरी गृहाजवळ गुरूवारी रात्री 7.15 वाजण्याच्या सुमारास स्वीफ्ट डीझायर कारने स्वीफ्ट डीझायर कारला धडक दिली. यावेळी मागून येणारी अल्टो कारची देखील धडक झाली. या धडकेत महिला किरकोळ जखमी झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी सुश्रुत अरूण मुळे (वय 45 रा. रविवार पेठ) हे त्याच्या स्वीफ्ट डीझायर कारमधून जुना आरटीओ ते वाढेफाटा मार्ग निघाले होते. अल्टो कार ही त्यांच्या मागून येत होती. यावेळी मुळे यांच्या गाडीला भिक्षेकरी गृहाजवळ समोरून येणाऱया स्वीफ्ट डीझायर कारने धडक दिली. या धडकेत गाडीचे बोनेट, इंजिन, हेडलाईटस आणि गाडीच्या उजव्या बाजूचा पुढील दरवाजा तुटल्याने गाडीचे नुकसान झाले आहे. तसेच मागून येणारी अल्टो कारची धडक बसल्याने बंपर, डीकी, हेडलाईटचे नुकसान झाले आहे. अल्टो कार मधील शुभांगी राजेश कांबळे (वय 40 रा. बोरीवली) या किरकाळ जखमी झाल्या आहेत. या वाहन चालकाविरूद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत.








