या स्पर्धेतील अंतिम सामन्यात कॅमेरॉन नुरीने ओपेल्कावर 7-6 (7-1), 7-6 (7-4) अशी मात केली. नुरीने या स्पर्धेत पहिल्यांदाच अजिंक्यपद पटकाविले असून एटीपी टूरवरील त्याचे हे तिसरे विजेतेपद आहे. 2021 साली इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेत नुरीने विजेतेपद पटकाविले होते. मात्र फ्लोरिडाच्या स्पर्धेत त्याला अंतिम सामन्यातील विजयासाठी तब्बल दोन तास झगडावे लागले. या स्पर्धेत मार्सेलो ऍरेव्हॅलो आणि जीन रॉजेर यांनी दुहेरीचे जेतेपद मिळविताना अंतिम सामन्यात ऍलेक्झांडर निडोव्हेसोव्ह आणि कुरेशी यांचा 6-2, 6-7 (5-7), 6-4 असा पराभव केला.
Trending
- Testing1
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









