क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
जमशेदपूर एफसीने आपल्या आगामी आयएसएल फुटबॉल मोसमात आणखी एक विदेशी फुटबॉलपटूशी करार केला आहे. ब्राझिलचा सेंटर बॅक इली साबिया हा यंदा जमशेदपूर एफसी संघाला खेळेल.
पीटर हार्टली, आलेक्स लिमा आणि नेरीजूस वाल्सकीस यांच्यानंतर जमशेदपूर एफसीशी करार करणारा इली साबिया हा चौथा विदेशी फुटबॉलर आहे. 32 वर्षीय मागील चार फुटबॉल मोसम चेन्नई एफसीसाठी होता. चेन्नईन एफसीसाठी खेळत असताना या संघाने 2019-20 आयएसएलच्या आणि 2019 हिरो सुपर कपच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता.
पीटर हार्टलीच्या प्रमाणे इली साबियाकडे बचावात खेळण्याचा चांगला अनुभव आहे. चार फुटबॉल मोसम आयएसएलमध्ये खेळण्याचा त्याला अनुभव आहे. त्याच्या समावेशाने आमच्या संघाची बचावफळी भक्कम होणार असल्याचा दावा जमशेदपूर एफसीचे प्रशिक्षक ओवेन कोयल म्हणाले.
आपल्या प्रोफेशनल फुटबॉल कारकिर्दीत इली साबिया पावलिस्ता, स्वीस लीगमध्ये खेळणाऱया एफसी लावसेन तसेच ब्राझिलच्या सांतोस आणि ऍथलेटिका पारानाईन्स या संघांना खेळला आहे. 2009-10 मोसमात सोतोस क्लबला खेळताना ब्राजिलीयन स्टार नेमारचा तो संघसाथीही राहिला आहे.









