प्रतिनिधी / बेळगाव
बेकिनकेरे येथील आझाद बॉईजच्यावतीने शनिवार दि. 16 व रविवार दि. 17 रोजी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. शर्यतीतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांसाठी 21 हजार, द्वितीय 18 हजार, तृतीय 15 हजार, चौथा 12 हजार, पाचवा 11 हजार यासह आकर्षक 15 बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. शर्यत केवळ दोन दिवस चालणार असून हौशी बैलजोडी मालकांनी नोंद घ्यावी, असे आयोजकांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी 8197827930 या क्रमांकावर संपर्क साधावा.









