ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 15 हजार 590 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 191 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 05 लाख 27 हजार 683 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 51 हजार 918 एवढी आहे.
गुरुवारी 15,975 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 01 लाख 62 हजार 738 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात 2 लाख 13 हजार 027 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
देशात आतापर्यंत 18 कोटी 49 लाख 62 हजार 401 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 07 लाख 30 हजार 096 कोरोना चाचण्या गुरुवारी (दि.14) करण्यात आल्या.









