वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचे माजी कर्णधार आणि जागतिक दर्जाचे फिरकी गोलंदाज 74 वर्षीय बिशनसिंग बेदी यांच्या हृदयावर येथील सिटी हॉस्पिटलमध्ये काही दिवसापूर्वी बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांच्या प्रकृतीत झपाटय़ाने सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
काही दिवसापूर्वी बेदी यांना हृदयामध्ये वेदना जाणवू लागल्यामुळे त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये त्वरित दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली आहे. बेदी यांना लवकरच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. 1967 ते 1979 या कालावधीत डावखुरे लेगस्पिनर बिशनसिंग बेदी यांनी 67 कसोटी आणि 10 वनडे सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व करताना अनुक्रमे 266 आणि 7 गडी बाद केले आहेत.









