वार्ताहर/ उचगाव
बसुर्ते येथील नवग्रह ब्रम्हलिंग मंदिरामध्ये मंगळवारी सायंकाळी रक्षागणहोम कार्यक्रम पौरोहित व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला.
बसुर्ते येथील ब्रम्हलिंग मंदिराचा जिर्णोद्धार करून नवीन मंदिराची उभारणी केली आहे. या मंदिराच्या उद्घाटन समारंभानिमित्त रविवारपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मंगळवारी सायंकाळी सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत रक्षागणहोम पूजा विविध दांपत्यांच्या हस्ते विधीनुसार पार पडली.
आज वास्तुशांती
बुधवार दि. 6 रोजी सकाळी मंदिर वास्तुशांती व गृहप्रवेश कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.









