अचूक बातमी “तरुण भारत”ची, शनिवार 13 नोव्हेंबर 2021, सकाळी 11.00
● बाधित वाढ रोखण्यात यश
● बहुतांशी तालुके कोरोनामुक्तीच्या वाटेवर
● सातारा तालुका नियंत्रणात
● शुक्रवारी दिवसभरात 26 जण नव्याने बाधित
● नव्याने 3817 जणांचे स्वॅब तपासणी केले
सातारा / प्रतिनिधी :
सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित आढळून येणाऱ्यांची संख्या पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. जिल्हा शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शुक्रवारी नव्याने जिल्ह्यामध्ये 26 जण बाधित आढळून आले असून पॉझिटिव्हिटी रेट 0.68 आला आहे. दिवसभरात 3817 जणांचे स्वॅब तपासण्यात आले.
आरोग्य यंत्रणेमुळे जिल्हा शून्य गाठतोय
सातारा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कोरोनाला रोखण्यासाठी मेहनत घेत आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील लसीकरण मोहीम अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्यासह सर्व यंत्रणा काम करत असून त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित वाढ रोखण्यात यश येऊ लागले आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये नव्याने होणारी बाधीत वाढ ही कमी कमी प्रमाणात आढळून येत असले तरी शून्य गाठण्यासाठी आरोग्य यंत्रणेचा प्रयत्न सुरू आहे त्यामध्ये जिल्ह्यातील नागरिकांचे ही तेवढेच सहकार्य मिळत आहे.
सर्वच तालुक्याची वाटचाल कोरोना मुक्तीच्या दिशेने
जावली, खंडाळा, कोरेगाव महाबळेश्वर, कराड यासह सर्वच तालुके कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहेत. तेथील आरोग्य यंत्रणा दिवसरात्र मेहनत घेत असून आपला तालुका लवकर कसा कोरोना मुक्त होईल, यासाठी जणू चढाओढ सुरू आहे. काही तालुक्यामध्ये नव्याने कोणीही बाधित आढळून येत नाही.
सातारा तालुका एक अंकावर येण्यासाठी प्रयत्नशील
सातारा तालुक्यात सातारा हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने येथे उपचार घेणारे हे सातारा असेच ठिकाण सांगत असल्याने साताऱ्यात आकडा हा वाढीव दिसत असल्याचे प्रशासनाच्या निष्कर्षात पुढे आले आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार हे तालुक्यातील प्रत्येक गावात लसीकरणापासून कोणी वंचित राहू नये यासाठी प्रयत्नशील आहेत. दरम्यान, त्यांचे सातारा शहरांवर प्राधान्याने लक्ष असते. सातर्र तालुका एक अंकावर येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
शनिवारी
नमुने – 3817
बाधित -26
शनिवारपर्यंत
नमुने- 22,59,726
बाधित -2,51,650
मुक्त-2,44,033
मुत्यु-6,457
उपचारार्थ-293









