कंपनी संस्थात्मक गुंतवणूकदारांची घेणार मदत
वृत्तसंस्था/ मुंबई
डिजिटल पेमेंट क्षेत्रातील पेटीएम कंपनी आयपीओ सादर करण्याअगोदर 2 हजार कोटी रुपये उभारण्याची तयारी करत आहे. सदरचा निधी हा संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या समभागातून उभारला जाणार आहे. दुसरीकडे कंपनी आयपीओच्या मदतीने मात्र 16,600 कोटी रुपये जमा करण्याची योजना आखत आहे.
उपलब्ध माहितीनुसार कंपनी आयपीओसाठी आगामी काही दिवसांमध्ये सेबीकडे प्रस्ताव सादर करणार आहे. यामध्ये 9 लोकांच्या प्रमुख पदांचीही घोषणा करणार असल्याची माहिती आहे. पेटीएम समभागधारकांनी सोमवारी 16,600 कोटी रुपयांच्या आयपीओला मंजुरी दिली होती. 12 हजार कोटी रुपयांची रक्कम नवीन समभाग सादर करुन उभारली जाणार असल्याचे कळते. दरम्यान विजय शेखर शर्मा यांना प्रमोटर बनविण्यात आले आहे.
संचालक मंडळात बदल
आयपीओच्या अगोदर कंपनीने मंडळ आणि अन्य नियमावलीत बदल केले आहेत. याअंतर्गत संचालक मंडळातून चीनी अधिकाऱयांना हटविले आहे. मागील आठवडय़ात कंपनीने 5.1 लाख समभाग 80 कर्मचाऱयांना दिले आहेत. याचे मूल्य 1 रुपयावर आधारीत राहिले आहे. यावर 8 रुपयाची सिक्युरिटी दिली आहे.









