मुंबई
ओप्पो कंपनीने आपले दोन नवे रेनो सिरीजअंतर्गतचे स्मार्टफोन्स बाजारात दाखल केले आहेत. 90 हर्टझ अमोलेड डिस्प्ले हे या फोन्सचे वैशिष्टय़ सांगितले जात आहे. ओप्पोचा रेनो 6 प्रो 5 जी आणि रेनो 6 हे स्मार्टफोन्स भारतात उत्तम कॅमेऱयासह दाखल करण्यात आले आहेत. जानेवारीत कंपनीने रेनो 5 सिरीजअंतर्गत मोबाइल फोन्स दाखल केले होते. त्याला प्रतिसाद मिळाल्यानंतर कंपनीने रेनो 6 सिरीजचे फोन्स लाँच करण्याचे निश्चित केले. ओपो रेनो 6 प्रोची किंमत 39 हजार 990 रुपये इतकी असणार आहे तर रेनो 6 ची किंमत 29 हजार 990 रुपये इतकी आहे.









