वृत्त संस्था/ मुंबई
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची आगामी निवडणूक 4 डिसेंबरला होणार आहे. मंडळाचे अध्यक्ष सौरभ गांगुली तसेच प्रमुख सचिव जय शहा यांनी ही माहिती दिली.
4 डिसेंबर रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीवेळी मंडळाच्या विविध पदासाठी निवडणूक मतदानाद्वारे घेतली जाणार आहे. या निवडणुकीत विविध पदासाठी इच्छूक असणाऱया व्यक्ती मंडळाचे पूर्ण सदस्य असणे जरूरीचे आहे. मंडळाच्या पूर्ण सदस्य असलेल्या व्यक्तींना या बैठकीसाठी निमंत्रित केले जाणार आहे. मंडळाच्या नियंत्रण समितीच्या रिक्त झालेल्या दोन सदस्यांसाठी ही निवडणूक घेतली जाणार आहे. इच्छुकांना अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर राहील. दि. 4 डिसेंबर रोजी निकाल जाहीर केला जाईल.









