प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिल्हय़ात कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असून मंगळवारी रात्री आलेल्या अहवालात केवळ 34 जण बाधित आले आहेत. तर 59 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याने एकूण कोरोनामुक्त होणारांचा आकडा आता 2 लाख 44 हजाराच्या पुढे गेला आहे. दीपावलीच्या सुट्टीनंतर लसीकरणाला पुन्हा वेग आला असून बुधवारी 12 हजारावर लसीकरण करण्यात आले. एका मृत्यूची उशिरा नोंद झाली आहे.
साताऱयात 11 नवे रूग्ण
सोमवारी रात्रीच्या अहवालानुसार आजचे व आजअखेर बाधित झालेल्यांची तालुकानिहाय आकडेवारी अशी आहे. सातारा 11 (52,038), कोरेगाव 6 (21,942), फलटण 4 (37,412), माण 3 (18,009), कराड 3 (39,244), खटाव 2 (25,882), जावली 1 (10,042), वाई 1 (15,773), पाटण 0 (10,145), महाबळेश्वर 0 (4,721), खंडाळा 0 (14,193) इतर 1 (2,181) असे एकूण 2,51,501 आजअखेर बाधित झालेल्याची संख्या आहे.
कोरोनामुक्ती 2 लाख 44 हजारांच्या पार
गेल्या काही दिवसात कोरोनामुक्तीचा वेगही मंदावला होता. मात्र मंगळवारी कोरोनामुक्तीचा वेगही वाढला असून 188 जणांना घरी सोडण्यात आले तर बुधवारी 59 जणांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे कोरोनामुक्तांची एकूण संख्या 2 लाख 44 हजाराच्या पार झाली झाली. आतापर्यंत 2 लाख 44 हजार 5 जण कोरोनामुक्त झाले सक्रीय रुग्ण संख्येचा आलेख खाली घसरुन तो 294 वर आला आहे.
बुधवारी 12,239 जणांना लस
लसीकरणाने पुन्हा गती घेतली असून सोमवारी 9 हजार 742 जणांनी लस घेतली होती. तर मंगळवारी 11 हजार 293 जणांनी लस घेतल्याने तर बुधवारी 12 हजार 239 जणांनी लस घेतल्याने जिल्हय़ातील लस घेणाऱया नागरिकांची एकूण संख्या 28 लाख 76 हजार 502 एवढी झाली आहे. यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 19 लाख 74 हजार 295 एवढी झाली असून दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 9 लाख 2 हजार 227 एवढी झालेली आहे.
गावे होताहेत 100 टक्के लसयुक्त
जिल्हय़ात लसीकरणाच्या मोहिमेने वेग घेतला आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत राज्यात 100 टक्के लसीकरण करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे जिल्हय़ात महाविद्यालय परिसर, गावांमध्ये घरोघरी लसीकरण करण्यात येत आहे. यामुळे जिल्हय़ातील अनेक छोटी गावे 100 टक्के लसीकरण झालेली आहेत. यात कराड तालुक्यातील 14 गावांचा समावेश आहे. तर दुसरा डोस घेण्यासाठी मुदत पूर्ण झाल्यानंतरही नागरिक पुढे येत नसल्याचे दिसत आहे.
बुधवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 22,50,193
एकूण बाधित 2,51,582
कोरोनामुक्त 2,44,005
एकूण मृत्यू 6,450
सक्रीय रुग्ण 294
बुधवारी जिल्हय़ात
बाधित 34
मुक्त 59
मृत्यू 00, उशिरा नोंद 01








