
वार्ताहर /किणये
पिरनवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा कुस्ती संघटना यांच्यावतीने शाह सद्रोद्दीन अन्सारी उर्फ जंगलीपीर उरुसानिमित्त रविवार दि. 27 रोजी दुपारी 2.30 वाजता नवीन ग्राम पंचायतीच्या कार्यालयानजीक जंगी कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे.
पहिल्या नंबरची कुस्ती कर्नाटक केसरी-मुंबई महापौर केसरी सुनील फडतरे विरुद्ध सांगली येथील हंडे पाटील तालमीतील पै. सुबोध पाटील यांच्यात होणार आहे. दुसऱया नंबरची कुस्ती तालीम भोसले व्यायामशाळा महाराष्ट्र येथील मारुती सुर्यवंशी विरुद्ध कर्नाटक केसरी संगमेश बिरादार यांच्यात होणार आहे. तिसऱया क्रमांकाची कुस्ती कर्नाटक चॅम्पियन मोतिबाग येथील शिवा दड्डी हुक्केरी विरुद्ध हंडे पाटील तालीम सांगली येथील गुलमाफ मुजावर आणि चौथ्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक चॅम्पियन रोहित पाटील विरुद्ध तासगाव तालीम येथील समीर मांडले यांच्यात होणार आहे.
क्रमांक 5 महादेव धारेनावर (इटगी) विरुद्ध विनायक (वास्कर कागल-गोरंबे), क्र. 6 हर्षद दानवळे (हातकणंगले) विरुद्ध प्रेमनाथ कंग्राळी (कंग्राळी तालिम), क्र. 7 अमृत पाटील बुधीहाळ निपाणी विरुद्ध प्रवीण पाटील निलजी, क्र. 8 ची कुस्ती पृथ्वीराज पाटील (कंग्राळी) विरुद्ध दयानंद इंगळगी (हुक्केरी), 9 नंबरची कुस्ती विश्वजित मानके (यळगुड) विरुद्ध पंकज चापगाव स्पोर्टस हॉस्टेल, 10 नंबरची कुस्ती पार्थ कृष्णा पाटील (कंग्राळी) विरुद्ध गणेश पाटील (निट्टूर कोवाड) यांच्यात होणार आहे.
या आखाडय़ात एकूण 40 नामवंत पैलवानांच्या कुस्त्या होणार आहेत. आखाडा उद्घाटनाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा कुस्ती संघटनेचे अध्यक्ष आप्पाजी मुचंडीकर असतील. मल्ल विद्या आश्रयदाते पुरस्कारप्राप्त सतीश पाटील यांच्या हस्ते आखाडय़ाचे उद्घाटन होणार आहे. हनुमान फोटो पूजन ग्रा. पं. माजी अध्यक्ष राकेश तळवार व इतर ग्रा. पं. सदस्य आणि शिवसेना तालुका प्रमुख सचिन गोरले यांच्या हस्ते होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज फोटो पूजन माजी एपीएमसी अध्यक्ष यशवंत नेसरकर यांच्या हस्ते तर आखाडय़ाचे पूजन शिवाजी शहापूरकर व इतर पंचमंडळींच्या वतीने करण्यात येणार आहे.









