वृत्तसंस्था/ पालेर्मो
डब्ल्यूटीए टूरवरील पालेर्मो महिलांची आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा येथे सोमवारपासून खेळविली जाणार असल्याची माहिती स्पर्धा आयोजकांनी दिली. या स्पर्धेत सहभागी होणारी एक महिला टेनिसपटू कोरोना चांचणीत पॉझिटिव्ह आढळली पण सदर स्पर्धा यापूर्वी जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसारच सोमवारपासून सुरू होईल, असे ठामपणे स्पर्धा आयोजिकांनी सांगितले.
कोरोनाची बाधा झालेल्या महिला टेनिसपटूने या स्पर्धेतून माघार घेतली असल्याचे स्पर्धा आयोजकांनी सांगितले. स्पर्धा आयोजकांतर्फे अलिकडे दोन खेळाडूंची कोरोना चांचणी घेण्यात आली होती आणि या चांचणीत त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले होते.









