वृत्तसंस्था / सिडनी
न्यूयॉर्कमध्ये 31 ऑगस्टपासून खेळविल्या जाणाऱया अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेतून ऑस्ट्रेलियाचा टेनिसपटू नीक किर्गिओसने कोरोनाच्या भितीने माघार घेतल्याची माहिती स्पर्धा आयोजिकांनी दिली आहे.
गेल्याच आठवडय़ात ऑस्ट्रेलियाची टॉप सीडेड महिला टेनिसपटू ऍस्ले बार्टीने अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. कोरोना माहामारीमुळे आतापर्यंत अमेरिकेत हजारो लोकांचे बळी पडले आहेत. आतापर्यंत सर्बियाचा टॉप सीडेड जोकोव्हिच, बल्गेरियाचा डिमिट्रोव्ह, कोरिक आणि ट्रोस्की यांना कोरोनाची बाधा झाली आहे. गेल्या मार्चपासून एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील सर्व स्पर्धा कोरोना संकटामुळे लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.









