पेशावर / वृत्तसंस्था
पाकिस्तानच्या वायव्य प्रांतात दोन प्रतिस्पर्धी जमातींमध्ये भडकलेल्या दंगलीमध्ये 15 लोकांचा बळी गेला आहे. ही दंगल एका वनभूमीचा ताबा घेण्यावरुन झाली असून या दंगलीत असंख्य लोक जखमीही झाले आहेत. खुर्रम जिल्हय़ाच्या प्रशासनाने या दंगलीमुळे खैबर पख्तुनख्वा भागात मोबाईल सेवा बंद केली. त्यानंतर पाकिस्ताचे लष्करी अधिकारी, राजकीय नेते आणि स्थानिक लोकांनी या दोन जमातींमध्ये सख्य घडवून आणले. ही दंगल गैदू जमातीच्या लोकांनी पेवार जमातीच्या काही लोकांवर गोळीबार केल्याने घडली, असे सांगण्यात आले.









