वृत्तसंस्था/ कराची
पाक महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार सना मिर हिला कोरोनाची बाधा झाली असून तिच्यावर वैद्यकीय इलाज सुरू असल्याचे पीसीबीच्या प्रवक्त्याने सांगितले.
पाकमध्ये सुरू असलेल्या कैद ए आझम चषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात सेना मिर टीव्हीवर क्रिकेटचे समालोचन करीत होती. गेल्यावर्षी सना मिरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यानंतर तिने क्रिकेट समालोचन क्षेत्रात प्रवेश केला. 34 वर्षीय सना मिरने 2009 ते 2017 या कालावधीत 226 आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकचे प्रतिनिधीत्व केले आहे. तिने आपल्या 15 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत 137 सामन्यांत पाक महिला संघाचे कर्णधारपद भूषविले आहे. 2010 आणि 2014 साली आशियाई क्रीडास्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱया पाक संघाचे तिने नेतृत्व केले होते.









