मंगळूर/प्रतिनिधी
दक्षिण कन्नड जिल्ह्यातील दोन नर्सिंग कॉलेजांमध्ये कोविडचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. आणखी २० विद्यार्थ्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले. यासह संक्रमित विद्यार्थ्यांची एकूण संख्या ७७ वर पोहोचली आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार वसतिगृहातील विद्यार्थ्यांना प्रवेश देताना दोन्ही महाविद्यालये प्रमाणित कार्यपद्धती पाळत नाहीत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रामचंद्र बी. यांनी बोलताना दोन्ही महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या असल्याचे सांगितले. तसेच नियमांनुसार, आरटी-पीसीआर चाचणी अहवाल नकारात्मक असेल तरच विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यास परवानगी देण्यात यावी. प्रवेशाचा काळ तपासणी अहवालात ७२ तासापेक्षा जास्त जुना नसावा. परंतु कॉलेजांनी नियमांकडे दुर्लक्ष केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वसतिगृहात सामाजिक अंतराच्या नियमांचेही उल्लंघन केले गेले. डॉ. रामचंद्र यांनी संसर्ग झालेल्यांमध्ये कोविडची कोणतीही लक्षणे नाहीत. वसतिगृहातच सर्वजण उपचार घेत आहेत.दोन्ही महाविद्यालयांनी एकूण ९०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. सुमारे ६०० विद्यार्थी केरळमधील आहेत. दरम्यान कोरोना तपासणीसाठी ७४३ जणांचे नमुने पाठविले आहेत.









