नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटी रूपयांचा चुना लावून परदेशी पळून गेलेला नीरव मोदी यांच्या पत्नीविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस (वॉरंट) काढले आहे. अमी असे तिचे नाव आहे. तीही मोदीसोबत पळून गेलेली आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात ही नोटीस काढण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
2019 मध्ये अमी ही अमेरिकेत दिसली होती. मात्र सध्या ती कोठे आहे यासंबंधी तपास अधिकाऱयांना माहिती उपलब्ध नाही. तिचे नाव पुरवणी आरोपपत्रात समविष्ट करण्यात आले आहे. तिने 3 कोटी डॉलर्स खर्च करून न्यू यॉर्क शहरात दोन सदनिका विकत घेतल्याची माहिती तपास अधिकाऱयांकडे आहे.
गेल्या मे महिन्यात या दोघांच्या विरोधात आरोपपत्र सादर करण्यात आले. नीरव मोदीने 6 हजार 498 कोटी रूपयांचा निधी लुबाडल्यग्नाचा आरोप आहे. हा निधी त्याने बेकायदेशीररित्या हवालाच्या माध्यमातून परदेशी नेला असाही आरोप आहे. गेल्या वर्षी नीरव मोदीला लंडन येथे अटक करण्यात आली होती. तो सध्यग्न वँडस्वर्थ येथील कारागृहात आहे. त्याला जामीन मिळालेला नाही. तो सध्या कॅरिबियन बेट अँटिग्वा येथे असून त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.









