विधानपरिषदेसाठी ज्योती महाविद्यालयात कार्यक्रम
प्रतिनिधी /बेळगाव
10 डिसेंबर रोजी होणाऱया विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी मतदान केंद्राचे अधिकारी व कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्यात आले. येथील ज्योती कॉलेजमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला.
नागराज मरेन्नावर यांनी अधिकारी व कर्मचाऱयांनी दि. 9 डिसेंबरच्या सकाळी 10 ते मतदानाच्या दिवशी 10 डिसेंबरच्या दुपारी 4 पर्यंत कशा पद्धतीने आपले कर्तव्य पार पाडावे, त्यांच्या जबाबदाऱया कोणत्या आहेत, कामकाज काय आहे? याविषयी सविस्तर माहिती दिली.
मतदान केंद्रावर जाण्यापूर्वी अधिकाऱयांनी मतपत्रिका, मतदारयादी, मतपेटय़ा आदी साहित्य यादीप्रमाणे घ्यावे. मतदानाला सुरुवात होण्याआधी एजंटांसमक्ष निवडणूक आयोगाच्या मार्गसूचीनुसार मतपेटीची तयारी करावी. मतदान पूर्ण होईपर्यंत नियमांचे काटेकोर पालन करावे, असे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी तहसीलदार आर. के. कुलकर्णी उपस्थित होते.









