वार्ताहर/ पुसेगाव :
निढळ ता खटाव येथील घाडगे वस्ती वरील दुचाकी वरील दोघांचा अपघाताने जागेवरच मृत्यू झाला. दिलीप भिमराव घाडगे (वय 40) व सुदाम धोंडीराम घाडगे(वय35)असे मयत व्यक्ती ची नावे आहेत. निढळ-पुसेगाव रस्त्यावर हा अपघात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी साडेसात च्या सुमारास दिलीप घाडगे व सुदाम घाडगे हे दोघे स्प्लेडर गाडीवरून पुसेगाव च्या दिशेने येत होते, निढळ पासून काही अंतरावर असलेल्या हॉटेल अथर्व समोर हा अपघात घडला. दुचाकी चालक दिलीप व मागे बसलेले सुदाम यांचा जागेवरच मृत्यू झाला. माहिती मिळताच पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके व कर्मचारी तातडीने दाखल झाले.सायंकाळ ची वेळ असल्याने या रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी असल्याने नेमका अपघात कसा घडला हे कोणालाही माहीत नाही, अज्ञात वाहनाने किंवा कशाने तरी धडक मारली असल्याची शंका व्यक्त होत आहे,मात्र अमित प्रकाश घाडगे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार अज्ञात वाहन व वाहन चालक यांच्याविरुद्ध पुसेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान मयत व्यक्तीच्या वर पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. सपोनि घोडके अधिक तपास करत आहेत.









