2022 मध्ये प्रत्येक बँण्डनुसार किमती होणार निश्चित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
प्रामुख्याने दिग्गज वाहन कंपन्यांपैकी मारुती सुझुकी, टोयोटा, स्कोडा आणि टाटासह अन्य कंपन्या जानेवारी 2022 पासून आपल्या वाहनांच्या मॉडेलनुसार किमती वाढविणार असल्याचे सांगितले जात आहे. सर्व कंपन्यांनी एक्सचेंज दरामध्ये चढउतार आणि कच्च्या मालाच्या वाढत्या खर्चामुळे हा निर्णय घेतला जात असल्याची माहिती आहे. यातील काही निवडक कंपन्या पुढीलप्रमाणे.
1. मारुती सुझुकी ः
मारुतीने सर्वात अगोदर जानेवारी 2022 पासून कारच्या किमती वाढविणार असल्याचा निर्णय घेतला आहे. वाढलेल्या किमती मारुतीच्या एरिना आणि नेक्सा मॉडेलवर लागू होणार असून मॉडेलनुसार यांच्या किमती निश्चित होणार असल्याची माहिती आहे. 2021 मध्ये कंपनीने आपल्या वाहनांच्या किमती तीन वेळा वाढविल्या आहेत.
2.हेंडा ः
होंडा जानेवारी महिन्यापासून आपल्या मॉडेलच्या किमती वाढविणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार इनपूट आणि कमोडिटी शुल्कात वाढ झाल्यामुळे त्यावर अभ्यास करुनच नवीन किमती निश्चित करणार असून येत्या काळात कंपनी वाढीबाबत अधिकृत घोषणा करणार असल्याचे संकेत आहेत.
3.टाटा मोर्ट्स ः
टाटा मोटर्सने जानेवारी 2022 पासून वाहनांच्या आपल्या पोर्टफोलियोमध्ये किमती वाढविणार असल्याची घोषणा केली आहे. यामध्ये व्यावसायिक व प्रवासी वाहनांचा समावेश राहणार आहे. टाटाने आपल्या व्यावसायिक वाहनांवर 2.5 टक्के किमती वाढविल्या असून हा नवा दर सर्व मॉडेल्सवर लागू होणार असल्याची माहिती आहे.
4.रेनॉ ः
रेनॉने दिलेल्या माहितीनुसार जानेवारीपासून आपल्या वाहनांच्या किमती वाढविण्यासाठी विचार करणार असून रॅनो भारतामधील चार मॉडेलची विक्री करते. यामध्ये क्विड, ट्रायबर, कीगर आणि डस्टरचा समावेश आहे.
5.टोयोटा ः
सर्व टोयोटा वाहनांच्या किमती नवीन वर्षात महागणार आहेत. टोयोटाने सर्व मॉडेल्सवर किमती वाढविणार असल्याची घोषणा केली आहे. यामध्ये भारतात टोयोटा आता इनोव्हा क्रिस्टा, फॉर्च्यूनर आणि बैझ इंजिनिअर अर्बन क्रूझर आणि ग्लँजा आदीची विक्री करत आहे.
6.स्कोडा ः
स्कोडा कंपनीने भारतात विक्री होणाऱया मॉडेल्समध्ये कुशाक, ऑक्टेविया आणि सुपर्बची किमत जानेवारी 2022 पासून 3 टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे ठरवले आहे. सदरच्या कंपनीने 2021 मध्ये आपल्या मॉडेल्सवर प्रथमच किमती वाढविल्या आहेत.
7.फोक्सवॅगन ः
फोक्सवॅगनने दिलेल्या माहितीनुसार जानेवारीपासून पोलो, वेंटो आणि टाइगुन गाडय़ांच्या किंमती 2 ते 5 टक्के इतक्या वाढविणार आहे. यामध्ये आतापर्यंत तरी मॉडेल्सनुसार किमती निश्चित केलेल्या नाहीत.
8.सिट्रोजेन ः
भारतामध्ये सिट्रोजेनकडून मॉडेल सी5 एअरक्रॉसची एक्स शोरुम किमत 3टक्के वाढविणार आहे. हा निर्णय दोन महिन्यात दुसऱयांदा होणार असून यात सी5 एअरक्रॉसच्या किमती वाढविल्या जाणार आहेत. जी मागील वर्षात नोव्हेंबरमध्ये झाली होती.
9.मर्सिडीज बेंझ ः
मर्सिडीज बेंझने मॉडेल्सवर 2 टक्के दर वृद्धी करण्याची घोषणा केली आहे. यावेळी कंपनी ज्या ग्राहकांनी आपल्या माय 2021 मॉडेल बुक केले आहे आणि त्यांना बुकिंग किमतीवरच वाहन खरेदी करता येणार असल्याची माहिती आहे.
10.ऑडी ः
ऑडी आपल्या सर्व मॉडेल्सवर 3 टक्के किमती वाढविणार आहे. तसेच अन्य सर्व कार कंपन्यांप्रमाणे कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीसह अन्य कारणांचा तपशील कंपनीने दिला आहे.









