वृत्तसंस्था/ कॅलिफोर्निया
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या इंडियन वेल्स मास्टर्स पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनचा राफेल नदाल, रशियाचा टॉप सीडेड मेदव्हेदेव आणि ग्रीकचा सित्सिपस यांनी एकेरीची तिसरी फेरी गाठली.
या स्पर्धेत शनिवारी झालेल्या पुरूष एकेरीच्या दुसऱया फेरीतील सामन्यात स्पेनच्या नदालने अमेरिकेच्या 21 वर्षीय सेबेस्टियन कोर्दाचा 6-2, 1-6, 7-6 (7-3) असा पराभव करत तिसरी फेरी गाठली. नदालने आपल्या टेनिस कारकीर्दीत विक्रमी 21 ग्रॅण्डस्लॅम अजिंक्यपदे मिळविण्याचा पराक्रम केला आहे. दुसऱया एका सामन्यात डॅनियल इव्हान्सने कोरियाचा 6-2, -0 असा पराभव करत तिसरी फेरी गाठली. नदाल आणि इव्हान्स यांच्यात तिसऱया फेरीचा सामना होईल.
रशियाच्या टॉप सीडेड मेदव्हेदेवने दुसऱया फेरीतील सामन्यात झेकच्या 21 वर्षीय मॅकहॅकचा 6-3, 6-2 असा पराभव करत तिसऱया फेरीत स्थान मिळविले. ग्रीकचा सित्सिपस आणि अमेरिकेचा जॅक सॉक यांच्यातील सामना अटीतटीचा झाला. या सामन्यात सित्सिपसने सॉकवर 7-6 (7-5), 3-6, 7-6 (7-5) त्याचप्रमाणे अन्य एका सामन्यात स्पेनच्या ऍलकाराझने अमेरिकेच्या मॅकडोनॉल्डचा 6-3, 6-3, ब्रिटनच्या कॅमेरून नुरीने स्पेनच्या मार्टिनेझचा 6-3, 6-3 असा पराभव करत तिसऱया फेरीत स्थान मिळविले.









