चिपळूण
काही दिवसांपूर्वी तालुक्यातील धामणवणे-शिगवणवाडी येथे किरकोळ कारणानंतर झालेल्या वादातून दोन गटात झालेल्या मारहाण प्रकरणी एका गटाला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, तर एका गटाला जामीन मंजूर झाला आहे. कोठडी प्राप्त गटाला बुधवारी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
सुनील पांडुरंग शिगवण, बबन कृष्णा शिगणव, गजानन कृष्णा शिगवण, जनार्दन कृष्णा शिगवण, काशिराम गोपाळ शिगवण, पर्शुराम भिकाजी शिगवण, समीर शांताराम शिगवण, रुपेश मनोहर शिगवण, नामदेव बबन शिगवण, चेतन शांताराम शिगवण, सुभाष बाबल शिगवण, रवींद्र लक्ष्मण शिगवण, जनाबाई राजाराम शिगवण, सुशीला गजानन शिगवण (&सर्व धामणवणे-शिगवणवाडी) आदीना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
तसेच सोमा सीताराम बेंडके, अनिल सोमा बेंडके, अनंत सोमा बेंडके, सुनिता सोमा बेंडके, विकास बेडके, राजा अशोक बेंडके, बंडय़ा अशोक बेंडके, वसंत पांडुरंग बेंडके, महेश वसंत शिगवण, पांडय़ा बबन उदेग, रंजन लक्ष्मण उदेग (सर्व धामणवणे-शिगवणवाडी) यांना जामीन मंजूर झाला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सागर चव्हाण करीत आहेत.









