नवजाताचे हे छायाचित्र व्हायरल
आशा सेविकेचे लोकांकडून होतेय कौतुक
हे छायाचित्र तुम्हाला गोंधळा पाडू शकते. पण या छायाचित्रामागील कहाणी जबरदस्त आहे. हा क्षण या गोष्टीचा पुरावा आहे की भारत सहजपणे पोलिओमुक्त झालेला नाही, या कामगिरीमागे उन्हाळा, हिवाळा, पाऊस आणि पूर अशा स्थितींमध्sयही आरोग्य कर्मचाऱयांनी लोकांच्या घरांपर्यंत पोहोचून त्यांच्या मुलांना ‘दो बूंद जिंदगी के’ दिले आहेत. हे छायाचित्र पश्चिम बंगालच्या सुंदरबन येथे असल्याचे सांगण्यात येते. तेथे पूराचे पाणी गावात शिरलेले असताना आशा सेविका मुलांना पोलिओचा डोस देण्यात पोहाचली. पूराच्या स्थितीत एका नवजाताला घरातील एका भांडय़ात घालून आणले गेले होते.

हे छायाचित्र सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्म्सवर शेअर करण्यात येत आहे. दिल्ली एम्सचे डॉक्टर योगीराज राय यांनी 26 सप्टेंबर रोजी ते शेअर केले होते. “गंगेच्या खोऱयातील सुंदरबनमध्ये पल्स पोलिओ लसीकरण, पूराचे पाणी शिरल्याने भागांमध्ये आरोग्य कर्मचाऱयांचे अथक प्रयत्न’’ अशी कॅप्शन त्यांनी जोडली आहे. या ट्विटला आतापर्यंत 2 हजारांहून अधिक लाइक्स आणि 400 हून अधिक रीट्विट मिळाले आहेत.
हे छायाचित्र रविवारी सिंघेश्वर येथे काढण्यात आल्याचे समजते पुराच्या पाण्यात चालण्यास नवजाताच्या आईला शक्य नव्हते. अशा स्थितीत नवजाताला पोलिओचा डोस मिळावा म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला एका मोठय़ा भांडय़ात ठेवून आणले.
छायाचित्रात चहुबाजूला पाणी असल्याचे दिसून येते. नवजात घरात वापरल्या जाणाऱया एका मोठय़ा भांडय़ात असल्याचे वडिलांनी ते धरून ठेवले आहे. नवजाताला पोलिओचा डोस दिल्यावर आशासेविक मार्करच्या मदतीने त्याच्या बोटावर खूण करताना दिसून येते. ही खूण बाळाला पोलिओचा डोस देण्यात आल्याचे दर्शविणारी असते.









