वृत्तसंस्था/ दुबई
येथे सुरू होणाऱया एटीपी टूरवरील 20 लाख डॉलर्स एकूण बक्षिस रकमेच्या दुबई डय़ुटी फ्री पुरूषांच्या खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या युकी भांब्रीने पुरूष एकेरीच्या प्रमुख ड्रॉ मध्ये स्थान मिळविले.
रविवारी येथे झालेल्या पात्र फेरीच्या शेवटच्या सामन्यात भांब्रीने आपल्याच देशाच्या रामकुमार रामनाथनचा 7-5, 5-7, 6-2 अशा सेट्समध्ये पराभव करत पुरूष एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविले. 31 वर्षीय भांब्री आता दुबई टेनिस स्पर्धेच्या पुरूष एकेरीत खेळण्यास पात्र ठरला आहे. या सामन्यात रामकुमार रामनाथनने 11 तर भांब्रीने 3 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली.









