हरी चव्हाण यांची माहिती; सिंधुदुर्गातील 25 हजार कामगारांचा समावेश
प्रतिनिधी / मालवण:
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे नोंदीत इमारती, इतर बांधकाम कामगार लाभार्थी यांच्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ गृहपयोगी वस्तू संच वितरण करण्याच्या योजनेला शासनाने मंजुरी प्रदान केली आहे. याचा लाभ महाराष्ट्रातील 10 लाख बांधकाम कामगारांना मिळणार असून त्यांना गृहोपयोगी भांडय़ांचा संच देण्यात येणार आहे. सिंधुदुर्गातील 25 हजार कामगारांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती बांधकाम कामगार महासंघ महाराष्ट्र प्रदेश संघटनमंत्री हरी चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
रोजगारासाठी नवीन बांधकाम जेथे सुरू होते, तेथे स्थलांतरित व्हावे लागते. अशा स्थलांतराच्या ठिकाणी त्यांना नव्याने निवास, पाल्याचे शिक्षण, आरोग्य विषयक समस्या व भोजन याबाबत जुळवून घ्यावे लागते. त्यांना दैनंदिन भोजन तयार करण्यास सहाय्य व्हावे म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांनी 27 ऑक्टोबर 2020 रोजीच्या बैठकीत राज्यातील मंडळांच्या 10 लाख नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच वितरण करण्याबाबत ठराव मंजूर केला होता. या ठरावाच्या अनुषंगाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत लाभार्थी बांधकाम (ज्यांची नोंदणी सक्रिय आहे) कामगारांच्या गृहोपयोगी वस्तू संच वितरण योजनेस मंजुरी देण्यात आली आहे. या कामगारांना 5 लिटरच्या प्रेशर कुकरसह 30 गृहोपयोगी वस्तूंचा संच देण्यात येणार आहे. यासाठी बांधकाम कामगारांची नोंदणी सक्रिय जीवित असणे आवश्यक असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली आहे. imestamp









