वृत्तसंस्था/ आगरताळा
त्रिपुरा पोलिसांचे विशेष तपास पथक (एसआयटी) बांगलादेशातून झालेल्या घुसखोरीची चौकशी करेल, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱयाने शुक्रवारी दिली. सोमवारी आणि मंगळवारी राज्याची राजधानी आगरतळाच्या बाहेरील राजनगर आणि रामनगर भागांत 27 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
अलीकडेच पश्चिम त्रिपुराच्या सिधई भागातून 20 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले होते. अलीकडच्या काळात या राज्यात मोठय़ा संख्येने बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली असून त्रिपुराच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये ही प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. महत्त्वाची प्रकरणे एसआयटीकडे हस्तांतरित केली जातील, असे सांगण्यात आले आहे.









