वार्ताहर/ रामदुर्ग
सुक्षेत्र तोंडीकट्टी येथील अवधूत गाळेश्वर मठाचे पीठाधीपती पुंडलिक महाराजांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त रथ मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिला आरती, कुंभकलशासह सहभागी झाल्या होत्या. गाळेश्वर मठात व्यंकटेश महाराजांनी मिरवणुकीस चालना दिली. गावातील दुर्गम्मा देवस्थान, शिवाजी सर्कल, कन्नड शाळा, गांधी सर्कल, हनुमान देवस्थान, बसस्थानक मार्गे मठापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत तोंडीकट्टी, बुदनी खुर्द, गुतीगोळ, होसकोटी, कमकेरी, कनसगेरी, किल्ला होसकोटी, दादनट्टी, कळ्ळीगुद्दी, बिचगुप्पी येथील भाविक, नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते..









