विर्नोडा-म्हस्कोण येथील घटना
प्रतिनिधी / पेडणे
विर्नोडा म्हस्कोण येथील नियोजित क्रीडानगरीच्या जागेत जात असलेल्या तिळारीच्या कालव्यात पाच गव्यांचा एक कळप अडकला असून हा कळप विर्नोडा भागातील तिथल्या शेताची मोठय़ा प्रमाणात नासधूस करत आहे. हा कळप मार्च एप्रिल महिन्यात आला असावा, असा अंदाज आहे. एका रानातून दुसऱया रानात जिथे चारा मिळेल तिथून हा कळप अन्नाच्या शोधण्यास आलेला आहे, जाण्यासाठी पुढे रस्ता सापडत नसल्याने तो अडकला आहे. वन खात्याने याची दखल घेऊन गव्यांच्या कळपाची सुटका करावी, अशी मागणी शेतकऱयांनी केली आहे.
शेतीची मोठय़ा प्रमाणात नासाडी
मोठय़ा कष्ठाने लॉकडाऊन काळात पेडणे तालुक्मयातील शेतकऱयांनी बागायतीची व शेतीची मशागत केली. आता जंगली जनावरांनी शेताची नुकसानी करायला सुरुवात केली आहे. हंसापूर भागात सलग चार दिवस गवे धुमाकूळ घालत आहेत. त्याशिवाय पाण्याच्या कॅनलमध्ये मनोसक्त मस्ती करतानाही चित्र दिसत आहेत.
हसापुर, चांदेल, इब्रामपूर या भागात मोठय़ा प्रमाणात शेतकरी शेती-बागायती, केळी बागायती व इतर पालेभाज्या मळे फुलवतात. परंतु पीक तयार झाल्यानंतर रानटी जनावरे या बागायतीत घुसून लाखो रुपयांची नुकसानी करतात. मात्र सरकारकडून योग्य ती नुकसानी मिळत नसल्याने शेतकरी विशाल नाईक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वनखात्याने या रानटी जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱयांकडून केली जात आहे.
लोकवस्ती वनात, वन्यप्राणी लोकवस्तीत
पूर्वी जाणकार लोक प्रथम पाण्याची सोय पाहून घरे बांधत असत, आता काळ बदलला असून आताची मंडळी अगोदर घरे बांधतात नंतर पाण्याची सोय करतात, जंगले ही वन्य प्राण्यासाठी राखीव ठेवली जायची, त्यामुळे कधीही चुकून देखील वन्यप्राणी लोकवस्तीत येत नसत, परंतु आता लोकवस्तीत वन्यप्राणी शिरू लागले आणि लोकवस्ती वनात वाढू लागली आहे. हे चित्र आता दिसत आहे. लोकवस्ती मोठय़ा प्रमाणात जंगलात, जंगलतोड करून वाढू लागली आहे मग जंगलातील प्राणी जाणार कुठे याचा मनुष्यांनी विचार केलेला दिसत नाही, जंगलातील वन्य प्राण्यांना आजही वनातील प्राण्याकडून नव्हे तर मनुष्याकाडूनच धोका जास्त संभवत आहे .
पेडणे तालुक्मयात मागच्या 7 ते 8 वर्षापूर्वी चांदेल, हंसापूर, इब्रामपूर, हळर्ण तळर्ण, पत्रादेवी, कासारवर्णे हाळी या भागात जंगलातील हत्ती लोकवस्ती घुसून शेताची, बागायातीची, फळाफुलांची नासाडी करत असत, मोठय़ा प्रमाणात केळीची नुकसानी करायचे, त्याच्या मागून आता गव्यांनी आपला मोर्चा लोकवस्तीत वळवलेला आहे. त्याशिवाय माकड आणि खेती पूर्णपणे लोकवस्तीत घुसून थैमान घालीत आहे, घराची कौले, बागायतींचीही नुकसान करीत आहे. याचा वन्य खात्याला बंदोबस्त करता आला नाही .









