गोवा फॉरवर्डची मागणी : अध्यक्ष विजय सरदेसाई यांचे भारतीय निवडणूक आयोगाला पत्र
प्रतिनिधी / मडगाव
गोव्यात मार्च, 2022 मध्ये विधानसभेचा कार्यकाळ संपणार असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कोविड-19 संदर्भातील लसीकरण करण्यास प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे गोवा फॉरवर्ड पक्षाने भारतीय निवडणूक आयोगाला पत्रव्यवहार करून कळविले असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी दिली आहे.
गोवा राज्याच्या विधानसभेचा वर्तमान कार्यकाळ समाप्तीच्या जवळ आला आहे. घटनात्मक आणि कायदेशीर गरजांनुसार पुढील विधानसभा निवडणुका समाप्तीच्या तारखेपासून सहा महिन्यांत घेतल्या जाऊ शकतात. कोविड-19 च्या गंभीर परिस्थितीत उर्वरित देशासह गोवा दुसऱया लाटेला सामोरा जात आहे. जी राज्ये विधानसभा निवडणुकांना सामोरी जाणार आहेत तेथे कोविडचा गंभीर प्रभाव पडण्याची शक्मयता फेटाळली जाऊ शकत नाही, असे सरदेसाई यांनी नजरेस आणून दिले आहे.
अलीकडेच पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांच्या वेळी कोविडविषयक निर्बंधांचे पालन न करता कशा राजकीय सभा झाल्या आणि गर्दी झाली ते दिसून आले आहे. यामुळे विषाणूचा प्रसार वाढल्याचा दावा होत आहे, याकडे पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने आता पुढील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी यांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्याची गरज त्यात व्यक्त करण्यात आली आहे. लोकशाहीच्या संरक्षणासाठी हे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे सर्व प्रौढ, जे पात्र मतदार समजले जसतात त्यांच्यासाठी लसीकरण बहुतेक सर्व राज्य सरकारांनी व केंद्र सरकारने खुले केले आहे. लसीकरणाचा वेग हा लसींच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. यामुळे आगामी निवडणुकांवर प्रभाव पडू शकतो. म्हणून 2022 मध्ये निवडणुकांना सामोऱया जाणाऱया राज्यांतील मतदारांचे व लोकांचे लसीकरण करण्यास प्राधान्य देण्यात यावे अशी आमची विनंती आहे. आम्हाला आपला सकारात्मक प्रतिसाद अपेक्षित आहे. आपल्याला आणि आपल्या सर्व सहकाऱयांना चांगले आरोग्य आणि सुरक्षा लाभो, असे सरदेसाई यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.









