मुंबई
आयटी क्षेत्रातील कार्यरत कंपनी टेक महिंद्रा यांच्या समभागात 7 टक्क्यांची उसळी शेअर बाजारात पहायला मिळाली. सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत कंपनीने 26 टक्के नफा कमावल्याच्या पार्श्वभूमीवर समभागात वाढ झाली असल्याची माहिती आहे. समभागाचा भाव बीएसईवर 6.88 टक्क्यांनी वाढून 1629.40 वर पोहचला होता तर एनएसईवर 6.94 टक्क्यांनी वाढून 1630 रुपयांवर पोहचला होता. सॉफ्टवेअर निर्यात कंपनी टेक महिंद्राने सप्टेंबरअखेर तिमाहीत 1338 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.









