नवी दिल्ली
टीव्हीच्या किमती पुढील काही दिवसात पुन्हा वाढणार आहेत असे सांगितले जात आहे. टीव्हीच्या किमतीमध्ये तीन ते पाच टक्के इतकी वाढ होणार असल्याचे संकेत आहेत.
सरकारने चीनमधून आयात होणाऱया ओपन सेल पॅनलवरील आयात शुल्कामध्ये वाढ करण्याचा विचार चालवला आहे. असे झाल्यास 2021 मध्ये तिसऱयांदा टीव्हीच्या किमती वाढलेल्या दिसणार आहेत. पॅनलची निर्मिती भारतातच करण्यासाठी सरकार आग्रही दिसते आहे. आयातीत पॅनेलवर सध्या पाच टक्के इतके शुल्क आकारले जात असून यात वाढ करण्याचा विचार केंद्राने सुरू केला आहे. जर का वाढ केली तरच टीव्हीच्या किंमती आगामी काळात वाढतील, असे सांगितले जात आहे.









